Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Konkan › मॅक्झिमोच्या धडकेने रिक्षाचालक ठार

मॅक्झिमोच्या धडकेने रिक्षाचालक ठार

Published On: Jul 19 2018 10:31PM | Last Updated: Jul 19 2018 10:26PMदेवरूख : प्रतिनिधी

 संगमेश्‍वर- देवरूख मार्गावरील साडवली येथे मॅक्झिमो आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात रिक्षाचालक जागीच ठार होऊन पाचजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडवली वनाज कंपनीच्या नजीक घडली. राजेंद्र वेल्हाळ असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.  

वेल्हाळ रिक्षा (एमएच08 ई 5577) घेऊन संगमेश्‍वर रेल्वे स्टेशनचे  भाडे सोडून पुन्हा देवरूखकडे परतत असताना  वनाज कंपनीजवळ  मॅक्झिमोची समोरासमोर जोरदार धडक झाली. मॅक्झिमो (एमएच 08 झेड 9504)  सांगवेतील देवेंद्र भास्कर शेलार यांची आहे. ती शेलार यांचा भाचा मयुरेश सरफरे चालवत होता. यामधून शेलार यांच्या घरातीलच दोन मुले नेहमीप्रमाणे घरी निघाली होती. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचालक  वेल्हाळ  रिक्षातच अडकून पडला.

घटनास्थळी धाव घेतलेल्यांनी वेल्हाळ यांच्यासह  जखमींना तत्काळ देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वेल्हाळ यांची तत्पूर्वीच प्राणज्योत मावळली. जखमींवर देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचार करून तीन गंभीर जखमी सुभाष तानाजी मेस्त्री, वसंत धोंडू कळंबटे (रा. परचुरी) व प्रवीण जयपाल देसाई (31, रा. हातकणंगले, कोल्हापूर) यांना  रत्नागिरी येथ हलविण्यात आले. तर मयुरेश सरफरे (23) व हर्ष शेलार (9) यांच्यावर देवरूख ग्रामीण उपचार सुरू आहेत.