Wed, Jul 17, 2019 18:25होमपेज › Konkan › घनदाट जंगलातील विहिरीत मृतदेह 

घनदाट जंगलातील विहिरीत मृतदेह 

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:57PMबांदा : वार्ताहर

इन्सुली येथील विवाहिता सौ. सुप्रिया सीताराम मोरजकर (35) यांचा मृतदेह वाफोली-टेमवाडी येथील घनदाट जंगलातील विहिरीत रविवारी सकाळी आढळून आला. शनिवारी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास त्या कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला  याबद्दल गूढ निर्माण झाले आहे. याबाबत त्यांचे वडील हरिराम शंकर गवस यांनी बांदा पोलिसांत खबर दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन  करण्यात आले. बांदा पोलिसात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 सुप्रिया मोरजकर यांचा इन्सुलीतील सीताराम मोरजकर यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांपासून त्या आपल्या माहेरी वाफोली येथे राहत होत्या. शनिवारी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास त्या घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्या आढळून आल्या नाहीत. रविवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास त्यांचा मृतदेह वाफोली-टेमवाडी रस्त्यालगतच्या जंगलातील विहिरीत आढळून आला. त्यांचे वडील हरिराम गवस यांनी बांदा पोलिसांत याबाबतची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बांदा पोलिसात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप धुरी करीत आहेत.