होमपेज › Konkan › रोडरोलरखाली चिरडून कामगार ठार

रोडरोलरखाली चिरडून कामगार ठार

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 9:20PMदापोली : वार्ताहर

दापोली-मंडणगड मार्गावर पिसई  येथे रोडरोलरच्या खाली चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. नातू राजू राठोड (35, कर्नाटक) असे या  तरुण कामगाराचे  नाव आहे.पिसई येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता  हा अपघात घडला. अपघाताची खबर राजू राठोड याने दापोली पोलिसांना दिली. याप्रकरणी रोलर चालकाविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  करंजाणी ते सोंडेघर यादरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे रोडरोलर वरील चालकाचा ताबा सुटला आणि रोलर वेगाने पुढे जावू लागला. याच वेळी रोलरच्या पुढे काम करणारा नातू राठोड रोलरच्या पुढील चाकाखाली चिरडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरू आहे.