Thu, Apr 18, 2019 16:16होमपेज › Konkan › हेमा चांदेकर स्मृती पुरस्कार शुभांगी गांधी यांना प्रदान 

हेमा चांदेकर स्मृती पुरस्कार शुभांगी गांधी यांना प्रदान 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी 

दापोली -मंडणगड तालुक्यातील अंध - मूकबधिरांची माय  म्हणून ओळखल्या जाणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी गांधी यांनी केलेल्या कार्याची दखल  घेत  मुंबई येथे ज्येष्ठ  साहित्यिका, अभिनेत्री  हेमा चांदेकर स्मृती पुरस्कार प्रा . प्रकाश जगताप यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. गेली 25 वर्षे सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या शुभांगी ताई यांचा ‘स्नेहज्योती अंध विद्यालय’  सुरु करण्यात सिंहाचा वाटा आहे. प्रतिभा सेनगुप्ता, आशाताई कामत या भगिनीं सोबत त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे.

स्नेहज्योती’च्या त्या फाऊंडर  मेंबर आहेत. इंदिराबाई वामन बडे या मूकबधिर शाळेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत या शाळेचे वर्ग वाढवण्यास यश आले. 5वी पर्यंत असणारी शाळा आता 10 पर्यंत झाली आहे.  दापोली तालुक्यात आवश्यक असणारी वृद्धाश्रमाची गरज ओळखून त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
समाजात अनेक  वृद्ध माता - पित्यांची  हेळसांड होत असल्याचे लक्षात आल्याने, कुमुदिनी दातार, प्रा. शांताबाई सहत्रबुद्धे, कोपरकर या समवयस्क मैत्रिणींनी  दातार 
वृद्धाश्रमाची स्थापना केली. त्याची मुख्य जबाबदारी शुभांगीताई पार पाडत आहेत. 

गेली 25 वर्षे महिलांसाठी शारदा महिला मंडळ, दातार वृद्धाश्रम ,  स्नेहज्योती अंध विद्यालय, इंदिराबाई बडे मूकबधिर विद्यालयाच्या  माध्यमातून निःस्वार्थी पणे  कार्य  केले आहे. याची  दखल  घेऊन ज्येष्ठ  साहित्यिका, अभिनेत्री हेमा चांदेकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.