Fri, Feb 22, 2019 06:13होमपेज › Konkan › दापोलीत कार उलटून चालकाचा मृत्यू

दापोलीत कार उलटून चालकाचा मृत्यू

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 9:54PM

बुकमार्क करा
दापोली : वार्ताहर

दापोली तालुक्यातील साखळोली येथे वॅगनआर कार उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. एक गंभीर  असून, त्याला उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. कोळबांद्रे यथील रक्षित रवींद्र यादव (वय 26) व त्याचा चुलत भाऊ विशाल सुनील यादव (33) हे कोळबांद्रे येथून कार घेऊन नवशी येथील नातेवाइकांकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
चालक रक्षितचा कारवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळली व उलटली.  या अपघाताचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदणे करत आहेत.