Sun, May 31, 2020 19:54होमपेज › Konkan › दापोलीत आजपासून अश्‍वमेध

दापोलीत आजपासून अश्‍वमेध

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : वार्ताहर

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोलीमध्ये दि. 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल आठ वर्षांनी हा मान पुन्हा दापोली विद्यापीठाला मिळाला आहे.

2009 मध्ये  ‘अश्‍वमेध 2009’ (क्रीडामहोत्सव) दापोली येथे आयोजित करण्यात आला होता. या क्रीडामहोत्सवामध्ये बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल तसेच अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश होतो. या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण आणि उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे, कृषिमंत्री आणि प्रति कुलपती पांडुरंग फुंडकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, उच्च तंत्रज्ञान, गृहनिर्माण आणि पालकमंत्री रवींद्र वायकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाशिव खोत उपस्थित राहणार आहेत. 

 क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विजय क्रीडा संकुल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ना. विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. दि. 1 डिसेंबर रोजी एड्स जनजागृतीसाठी भव्य रॅलीला व क्रीडा महोत्सवाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी प्रदीप पी. तर विशेष अतिथी म्हणून दापोलीचे सुपुत्र, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. 

2500 खेळाडूंचा सहभाग अपेक्षित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य हे या समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.  क्रीडा महोत्सवासाठी सर्वसाधारणपणे 2 हजार 500 विद्यार्थी खेळाडू, 500 प्रशिक्षक सहभाग घेणार आहेत.