Thu, Jul 18, 2019 08:59होमपेज › Konkan › गुहागर : समुद्र किनाऱ्यावर तरुणांनी पकडली मगर (Video)

गुहागर : समुद्र किनाऱ्यावर तरुणांनी पकडली मगर (Video)

Published On: Jul 11 2018 2:51PM | Last Updated: Jul 11 2018 2:51PMगिमवी (गुहागर ) : लक्ष्मीकांत घोणसेपाटील 

गुहागर शहरातील वरचापाट भांडरवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मगर आली होती. त्या मगरीला स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडले. त्यानंतर मगरीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील तरुणांना साडेसात फूट मगर दिसली. मगर वस्तीच्या दिशेने जात असल्याने वस्तीतील रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये व मगर सुरक्षित राहावी  म्हणून तरुणांनी तातडीने दोरीच्या साहाय्याने मगरीला पकडले त्यांनतर पकडलेली मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली वन विभागाने या मगरीला गुहागर-चिपळूण मार्गावरील तांबी येथील धरणामध्ये सोडले.  समुद्रचौपाटीवर सापडलेली ही मगर आरे येथून येणाऱ्या नदीतून आली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.