Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Konkan › पोलादपुरात विष प्राशन करून युवकाचीआत्महत्या

पोलादपुरात विष प्राशन करून युवकाचीआत्महत्या

Published On: Jul 02 2018 12:16PM | Last Updated: Jul 02 2018 12:16PMपोलादपूर : वार्ताहर

पोलादपूर गाडीतळे येथे एका १८ वर्षीय तरुणाने रागाच्या भरात विषारी द्रव्‍य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार रात्री ८.३० वाजता घडली.

याबाबत सुरेखा सुरेश पवार यांनी पोलादपूर पोलिसात तक्रार दाखल केली. किशोर सुरेश पवार (वय १८ रा गाडीतळे, पोलादपूर) याला रविवार रोजी आई सुरेखा हिने केस कापण्यासाठी शंभर रुपये दिले होते. तो केस न कापता घरी आल्यानंतर आईने त्याला रागवले. यानंतर आईलाही त्याने शिवीगाळ केली. वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने विषारी द्रव्‍य प्राशन केले. यानंतर त्याला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद पोलादपूर पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली असून अधिक तपास एएसआय मिंडे करीत आहेत.