Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › दुचाकी चोरट्यांच्या टोळीत 2 अल्पवयीन

दुचाकी चोरट्यांच्या टोळीत 2 अल्पवयीन

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PMखेड : प्रतिनिधी 

गेल्या वर्षभरात खेड शहर आणि परिसरातून चोरीला गेलेल्या पाच दुचाकींचा शोध लागला आहे. या दुचाकी चोरीच्या टोळीमध्ये खेडमधील दोन अल्पवयीन बालकांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. सांगली येथील एक म्होरक्याच्या मदतीने ही मुले खेडमध्ये गेले वर्षभर दुचाकी चोर्‍या करत असल्याचे उघड झाले आहे.

या बाल गुन्हेगारांना खेड पोलिसांनी रत्नागिरी येथील बाल न्याय मंडळ येथे हजर करण्यात आले आहे. तसेच या टोळीचा म्होरक्या निरंजन संजय कोरडे (19,  कडेगाव, जिल्हा सांगली) याला सातारा पोलिसांकडून खेड पोलिसांनी खेडमधील दुचाकी चोरी प्रकरणात वर्ग करून घेतले आहे. 

खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे खेड पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येणार्‍या खेड शहर आणि वेरळ, गुलमोहर पार्क  या परिसरामधून गेल्या वर्षभरात पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या संधर्भात खेड पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले होते.

सातारा पोलिस ठाणे यांनी संशयित आरोपी निरंजन कोरडे याला पकडले होते. त्याच्या चौकशीमध्ये हा अट्टल गुन्हेगार असल्याचे समजताच सातारा पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीमध्ये त्याने खेडमधील दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार खेड पोलिसांनी संशयित निरंजन कोरडे याला खेड पोलिस ठाण्याने सातारा पोलिसांकडून वर्ग करून घेतले.

खेड पोलिसांनी कोरडेची चौकशी केली असता त्याने खेडमधील दोघांच्या मदतीने 5 ठिकाणच्या दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याच्या दोन संशयित अल्पवयीन सहकार्‍यांना खेड पोलिसांनी ताब्यात घेत रत्नागिरी येथील बाल न्याय मंडळ येथे हजर केले.