Mon, Jul 06, 2020 03:37होमपेज › Konkan › साटेली-भेडशीत जुगार  अड्ड्यावर छापा; दोघे फरार

साटेली-भेडशीत जुगार  अड्ड्यावर छापा; दोघे फरार

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:53PM

बुकमार्क करा

दोडामार्ग : वार्ताहर 

साटेली-भेडशी ग्रा. पं.  कार्यलयाजवळच्या एका इमारतीत  चोरीछुपे चालू असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून  चार दुचाकींसह 1 लाख  26 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच दोघे संशयित पळून गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी साटेली येथे जत्रोत्सव होता. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयानजीक असलेल्या एका इमारतीत अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती दोडामार्ग पोलिसांना मिळली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता,  त्याठिकाणी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 4 हजार 420 रुपये आढळून आले. पोलिसांचा छापा पडताच घटनास्थळा वरून दोन आरोपींनी पलायन केले. त्या ठिकाणी चार मोटारसायकल आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. दरम्यान, पळून गेलेल्या दोघांचीही ओळख पटली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अनंत पांडुरंग गवस (38) व लक्ष्मण महादेव देऊलकर (42) अशी या फरार संशयिताची नावे आहेत. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलिस करीत आहेत .