Sat, Feb 23, 2019 04:52होमपेज › Konkan › सोशल मीडियातून होणारी परमेश्‍वराची निंदा दुर्दैवी

सोशल मीडियातून होणारी परमेश्‍वराची निंदा दुर्दैवी

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:53PM

बुकमार्क करा
 

चिपळूण :  शहर वार्ताहर

सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या घडीला देश, धर्मग्रंथ, परमेश्‍वराची निंदा सुरू आहे. सोशल मीडियाचा वापर करून कोणी काहीही पसरवत असून हा प्रकार दुर्दैवी असल्याचे पखरड मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्‍त केले. श्री स्वामी चैतन्य परिवार, चिपळूण यांच्या वतीने शहरात कीर्तनमाला महोत्सव सुरू आहे. महोत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशी आफळेबुवांनी परखड मत मांडले. या कीर्तनमालेत आफळेबुवा कृष्णावतार उलगडणार आहेत. कृष्णकथेतील पहिले पुष्प गुंफताना ते म्हणाले, सत्याची पाठराखण करणारी देवकी व वसुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णांनी जन्म घेणे ही एक दैवी योजना होती. त्या बाबत आफळेबुवांनी विवेचन केले.  ते पुढे म्हणाले, धर्मग्रंथांची आज निंदा होताना दिसून येत आहे. न्यूटन गॅलिलिओ या सारख्या शास्त्रज्ञांनीही कधी धर्मग्रंथांची निंदा केली नाही. आज देव, धर्म, देश यांची निंदा म्हणजे संतांची निंदा आहे. हे सर्व थांबविण्यासाठी आपण प्रत्येकाने जागरुक राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कीर्तनमालेच्या उद्घाटनावेळी आ. सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रवचनकार धनंजय चितळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील स्व. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात दि. 13 जानेवारीपर्यंत सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत कीर्तनमाला होणार आहे. यासाठी ऑर्गनसाथ रेशीम खेडेकर, मृदुंगसाथ मनोज भांडवलकर, तबलासाथ मिलिंद नायवाडे, बासरीसाथ रवींद्र खंडारे यांची लाभत आहे. तसेच चिपळुणातील वरद केळकर याची गायनसाथ, संजय बुरंबाडकर व सुधाकर केळकर यांची टाळ साथ लाभत आहे.