रत्नागिरी ः प्रतिनिधी
बँकेकडे तारण म्हणून ठेवलेले घर आणि जमीन परस्पर विक्री करून बँकेची 24 लाख 88 हजार 710 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नी विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना 19 सप्टेंबर 2016 ते 17 जुलै 2017 या कलावधीत घडली आहे.
याबाबत राजेश गणेश बापट आणि रिमा राजेश बापट (दोघेही रा. गणपतीपुळे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्याविरोधात बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे येथील शाखेेचे व्यवस्थापक संतोषकुमार बलराम ठाकूर (28, रा.शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिसांकडे गुरुवार 14 जून रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बापट दाम्पत्याने 2015 मध्ये आपले गणपतीपुळे येथील घर आणि जमीन बँक ऑफ इंडियाकडे तारण ठेवून 24 लाख 88 हजार 710 रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतू याची नोंद सातबारावर न चढवता या दाम्पत्याने कोळंबे येथील रहिवासी अरुण दामले यांना ते घर आणि जमीन परस्पर विक्री करुन बँकेची फसवणूक केली. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार बनप करत आहेत.