Fri, Jul 19, 2019 07:20होमपेज › Konkan › ...अन्यथा कामबंद 

...अन्यथा कामबंद 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर 

माडखोल येथील कंत्राटी कामगार शांताराम राऊळ यांना मारहाण करण्यात आल्याप्रकरणी कंत्राटी कामगार संघटनेने जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणचे उपअभियंता अमोल राजे यांना रविवारी घेराव घातला. वीज वितरणच्या कंत्राटी कामगारांना मारहाण व धक्‍काबुक्‍की करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वीज वितरणने घ्यावी; अन्यथा जिल्हाभर कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने उपअभियत्यांना  दिला.

यावेळी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमान पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा प्रतिनिधी आनंद लाड, तालुका प्रतिनिधी रामचंद्र राणे, अमोल हुनसवार, संदीप बांदेकर, शांताराम राऊळ, बबलू शिरोडकर,  संदेश राऊळ व कंत्राटी कामगार उपस्थित होते.

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या कामगारास मारहाण होण्याची घटना संतापजनक असल्याच्या संतप्‍त भावना कामगारांनी व्यक्‍त केल्या.

Tags :  contract worker Shantaram Roul assault case Sawantwadi news


  •