Thu, Nov 15, 2018 03:14होमपेज › Konkan › काँग्रेसच्या देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची महाडमध्ये सुरुवात ! 

काँग्रेसच्या देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची महाडमध्ये सुरुवात ! 

Published On: Apr 09 2018 2:51PM | Last Updated: Apr 09 2018 2:45PMमहाड : प्रतिनिधी 

देशात गेल्या काही महिन्यात सुरू झालेल्या जातीय दंगली तसेच विविध कारवायांविरोधात काँग्रेसने आज देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची हाक दिली. काँग्रेसच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय उपोषण महाड शहरातील ऐतिहासिक चवदार तळे येथे सकाळी अकरा वाजता सुरू झाले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत यांनी उपोषणापूर्वी चवदार तळे येथील भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह चवदार तळ्याच्या प्रांगणामध्ये उपोषणास सुरुवात केली आहे.

या उपोषणाच्या ठिकाणी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांसह महाड नगरपालिका उपाध्यक्षा यादव यांच्यासह सत्तारुढ काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, सभापती संदीप जाधव, प्रमोद महाडिक, शहराध्यक्ष प्रशांत महामुणकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे ,कृषी उत्पन्न बाजार समिती, अध्यक्ष श्रीधर सकपाळ यांच्यासह विविध पदाधिकारी पंचायत समिती सदस्या येरुणकर, माजी पंचायत समिती सदस्या कालगुडे,  मनवे यांसह माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.