Sat, Dec 07, 2019 15:00होमपेज › Konkan › नाण्यांना अडीच हजार वर्षाचा इतिहास

नाण्यांना अडीच हजार वर्षाचा इतिहास

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 9:38PM

बुकमार्क करा
सावंतवाडी : प्रतिनिधी

नाण्यांचा अडीच हजार वर्षांचा इतिहास असून त्या त्या काळात राजवट कोणाची होती हे स्पष्ट करताना मुंबई येथील डॉ. दिलीप बलसेकर यांनी नाण्यांच्या अभ्यासातून नाण्यांचा इतिहास उलगडला. ते ‘नाणेशास्त्र व ऐतिहासिक संदर्भ’ या विषयावर बोलत होते. 

श्रीराम वाचन मंदिर येथे देशभक्‍त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ.दिलीप बलसेकर बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक नेवगी, कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, रमेश बोंदे्र, निला आपटे आदी उपस्थित होते.

यावेळी ‘श्री मणी हे गांधी समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शन  करण्यात आले. महात्मा गांधीजींनी बहुजन समाजाला आणि सर्व जातीधर्माला एकत्र आणण्याचे काम केले. गांधीजी हे वेगळ्या विचाराचे होते, असे मत गोव्याचे गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी व्यक्‍त केले. नगराध्यक्ष साळगावकर यांनी गांधीजींचे विचार निश्‍चितच देशाला प्रेरणा देणारे आहेत.  परंतु आपला देश वेगळ्या दिशेने झुकत चालला असल्याबद्दल चिंता व्यक्‍त केली.बाळासाहेब बोर्डेकर, प्रा. अरुण पणदुरकर, डॉ. जी. ए.बुवा, वाय.पी.नाईक, भरत गावडे, सखी पवार, सुरेश गवस, प्रसाद पावसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेधा नाईक-धुरी यांनी केले.