Thu, Aug 22, 2019 10:13



होमपेज › Konkan › उत्तर रत्नागिरीत कडकडीत बंद

उत्तर रत्नागिरीत कडकडीत बंद

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:36AM



चिपळूण : खास प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार ‘महाराष्ट्र बंद’ला उत्तर रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद, तर दक्षिण रत्नागिरीत मात्र संमिश्र प्रतिसाद लाभला. तालुक्यांच्या ठिकाणी मागण्यांची निवेदने देण्यात आली. मराठा समाज बांधवांनी मंगळवारी सकाळी मोर्चा काढून व्यापार्‍यांना दुकान बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर व्यापार्‍यांनी पाठिंबा देत दुकाने बंद केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर रत्नागिरीत बंद यशस्वी झाला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली.

औरंगाबाद येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. याचे पडसाद गुहा

‘आरक्षण आमच्या हक्काचे..’, ‘या सरकारचे करायचे काय...’ अशा घोषणा देत हा मोर्चा बाजारपेठ, भेंडीनाका, नाईक कंपनीकडून मार्कंडी ते बहादूरशेखपर्यंत काढण्यात आला. बहादूरशेख येथे मृत काका शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चिपळूण बाजारपेठ सकाळी 11 पासून बंद ठेवण्यात आली. यामुळे शहरातील व्यापार ठप्प झाला. शहरातील रिक्षा व खासगी वाहतुकीला फटका बसला. चिपळुणात मोर्चाला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी एस.टी. वाहतूक बंद केली. यामुळे चिपळूण आगारात प्रवासी अडकून पडले. बाहेरगावच्या गाड्या आगारात दाखल होत होत्या. मात्र, दुपारनंतरही बसेस धावल्या नाहीत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. दुपारपासून बाहेरगावी जाणार्‍या गाड्याही आगारातच उभ्या होत्या. शिवाय गुहागरकडून येणार्‍या गाड्याही बंद करण्यात आल्या. गुहागर, दापोली, खेड आणि मंडणगडमध्येही बंद पाळण्यात आला. मात्र या भागात 70 टक्के प्रतिसाद लाभला. तर रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर आणि लांजा तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. यावेळी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदने देण्यात आली.