Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Konkan › हेवाळे गावाला दुसर्‍यांदा तालुकास्तरीय स्वच्छता पुरस्कार

हेवाळे गावाला दुसर्‍यांदा तालुकास्तरीय स्वच्छता पुरस्कार

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:16PMदोडामार्ग ः प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यात पहिले  स्मार्ट ग्राम बनलेल्या आयनोडे-हेवाळे ग्रामने यावर्षीही आपली गौरवशाली कामगिरी कायम राखत सलग दुसर्‍या वर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात  तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

आयनोडे -हेवाळे व कुडासे खुर्द या गावांना यावर्षीचा प्रथम पुरस्कार विभागून देण्यात आला. गतवर्षी आयनोडे- हेवाळेला प्रथम क्रमांकाचे 1  लाखांचे बक्षीस मिळाले होते. मात्र, एकदा तालुका पातळीवर बक्षीस मिळालेल्या रकमेचे पुन्हा पुढील पाच वर्षे पुरस्कार मिळाला तरी त्याची रक्कम त्या ग्रामपंचायत मिळत नाही. मात्र, हेवाळे ग्रामने यावर्षी प्रथम क्रमांक पटकविल्याने हेवाळे ग्रामजिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विभागून नंबर मिळल्याने कुडासे खुर्दसह  दुसर्‍या क्रमांकाची झोळंबे ग्रामपंचायत सुद्धा स्वच्छतेत पुढे आली आहे. आदर्श गाव केर  मात्र, यावेळी तिसर्‍या क्रमांकावर आहे. हेवाळेसह विजेत्या ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हेवाळे सरपंच संदीप देसाई यांनी ग्रामस्वच्छता अभियानात सर्वोच्च काम करणार्‍या ग्रामवासीयांचे विशेष आभार मानले असून आपण जिल्हा ते राज्यस्तरीय पातळीवर काम करण्यासाठी सज्ज असून याकामी तालुका व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यासाठी सुद्धा  समाधान व्यक्त केले आहे.  

हेवाळेचा इतरांसाठी आदर्श

गतवर्षी तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून यावर्षी सुद्धा ग्रामस्वच्छता अभियानात सातत्य राखताना घनकचरा व्यवस्थापन साठी भंगार संकलन व गांडूळखत निर्मिती प्रकल्प तसेच स्वच्छ पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन याबाबत अतिशय अधोरेखित होणारे काम केले आहे. अलिकडेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाणी पुरवठा व स्वछता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या महाचर्चेत सरपंच संदीप देसाई यांनी मंत्री महोदयाना लिहिलेल्या स्वच्छते संदर्भातील पत्राचे वाचन करण्यात आले होते.  हेवाळे ग्रामने  खास महिलांसाठी असलेल्या उत्कर्षा मासिक पाळी व्यवस्थापन सुद्धा कार्यक्रम सर्वप्रथम दोडामार्ग तालुक्यात यशस्वीपणे पूर्ण केला. महास्वच्छता, महाश्रमदान व महावृक्षारोपण,जलसंधारण यासारखे स्मार्ट ग्राम हेवाळेचे उपक्रम या यशापर्यंत पोहचविण्यात व इतरांसाठी प्रेरणादायी असेच ठरले आहेत.