होमपेज › Konkan › देशात अघोषित आणीबाणी : खा. दलवाई

देशात अघोषित आणीबाणी : खा. दलवाई

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 10:15PMचिपळूण : प्रतिनिधी

देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला  आहे. देशात शांतता राहावी याचसाठी काँग्रेसने उपोषण केले, असे खासदार हुसेन दलवाई यांनी उपोषणादरम्यान पत्रकारांबरोबर बोलताना सांगितले.

या उपोषणात अशोक जाधव, सुजित झिमण, शौकत मुकादम, सावित्री होमकळस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. सकाळी 10 वाजता कार्यकर्ते उपोषणाला बसले. सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपोषण करण्यात आले. 

 याप्रसंगी खा. म्हणाले, देशात सामाजिक, धार्मिक, जातीय ऐक्याला तडा देण्याचे काम सुरू आहे. देशाच्या ऐक्याला हे सरकार बाधा पोचवत आहे. चुलीपासून घरापर्यंत सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे समाजात अशांतता आहे. भय निर्माण झालेले आहे. शांतता निर्माण व्हावी म्हणून काँग्रेस देशात हे उपोषण करीत आहे. सरकारच्या धोरणामुळे सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याला बाधा मिर्माण झाली आहे. याविरोधात हे उपोषण आहे. 

कोकणात काँग्रेस मजबूत होणार आहे. लवकरच याबाबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. येथील जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष नेमणुकाबाबत लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर दिले.