होमपेज › Konkan › कामथे घाटात एसटी कोसळली

कामथे घाटात एसटी कोसळली

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:05PMचिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात बोलेरोला बाजू देताना एस.टी. बस दरीत कोसळली. या अपघातात सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, बसचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री झाला. 

याप्रकरणी बोलेरो चालक अमोल गणपत वाडेकर (रा. देवगड) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  यानुसार, बोरिवली-देवगड बस घेऊन येणारे बाळकृष्ण हरिश्‍चंद्र चव्हाण (39, रा. हरकूळ, जि. सिंधुदुर्ग) हे कामथे घाटात आले असता समोरून आंबा भरुन आलेली बोलेरो पीकअपवर एस.टी. बस उजव्या बाजूला जाऊन आदळणार इतक्यात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही गाडी रस्ता सोडून डाव्या बाजूला कामथे घाटात दरीत कोसळली. सुदैवाने प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. या गाडीत पंधरा प्रवासी होते. 

यापैकी मयूर मनोहर शिर्सेकर (17, रा. गोरेगाव), जयश्री राजाराम रहाटे (70, जोगेश्‍वरी), सुनील सुहास तेली (51), जयश्री जयंत गोखले (50), रसिका सुहास तेली (14) व चालक बाळकृष्ण चव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एसएमएस रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगारप्रमुख संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चालक चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.