Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Konkan › श्रीदेव करंजेश्‍वरीचा २७ पासून शिमगोत्सव

श्रीदेव करंजेश्‍वरीचा २७ पासून शिमगोत्सव

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 11:03PMचिपळूण : शहर वार्ताहर

शहरातील गोवळकोटची ग्रामदेवता श्री देव सोमेश्‍वर व श्री देवी करंजेश्‍वरीचा शिमगोत्सव 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. प्रसिद्ध असा शेरणे काढण्याचा कार्यक्रम 1 मार्च रोजी होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. 27 रोजी दु. 3 वा. शिमगोत्सवास प्रारंभ होईल. यानंतर करंजेश्‍वरीची पालखी गोविंदगडावर जाईल व तेथील श्री देवी रेडजाईची भेट होईल. यानंतर रात्री 10 वा. बाजार पुलापासून माहेर असलेल्या पेठमापकडे पालखी रवाना होईल. दि. 28 रोजी सकाळी 8 वा. पेठमाप सहाणेवर पालखी थांबेल. रात्री 11 वा वसंत वाडेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत भक्तगणांची शेरणे स्वीकारली जातील. दि. 1 मार्च रोजी सायंकाळी 4 वा. वाशिष्ठी नदीकिनार्‍यावर पेठमाप येथे प्रसिद्ध शेरणे काढण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर पालखी रात्री 10 वा. गोवळकोटकडे रवाना होणार आहे.

दि. 2 मार्च रोजी सकाळी 7 वा. गोवळकोट येथील होम प्रज्वलित होईल. सायंकाळी 5 वा. गोवळकोट सहाणेवरुन मंदिराकडे पालखीची मिरवणूक काढण्यात येईल व यानंतर शिमगोत्सवाची सांगता होईल. यावेळी भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, खजिनदार तुषार रेडीज, सचिव उदय जुवळे यांनी केले आहे.