Mon, Jun 17, 2019 14:35होमपेज › Konkan › सेनेची भूमिका मतलबी

सेनेची भूमिका मतलबी

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 9:22PMचिपळूण : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून गेल्या दोन वर्षांपासूनच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. तेव्हा शिवसेना व खासदार राऊत गप्प का होते, असा सवाल करून रिफायनरीला निमंत्रण त्यांनीच दिले. शिवाय, शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी प्रकल्पाची अधिसूचना काढली. असे असताना पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरोधात गरळ ओकायची हा बनाव स्थानिक जनतेला समजून चुकला आहे. शिवसेनेची भूमिका ढोंगी व मतलबी असल्याचे टीकास्त्र भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सोडले. 

राजापुरातील डोंगरतिठा येथे शिवसेनेने  शनिवारी प्रस्तावित नाणार रिफायनरीविरोधात एल्गार सभा घेतली. या सभेत खा. राऊत व शिवसेना पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाच लक्ष्य केले व प्रकल्प हटावचा नारा दिला. शिवसेनेच्या या भूमिकेवर रविवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी हल्ला चढविला. 

ते पुढे म्हणाले की, सेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते व खा. विनायक राऊत यांनीच मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाचा आग्रह धरला होता. तसा खुलासा स्वत: मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शिवाय, सेनेचेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पाची अधिसूचना काढली आहे. हा सेनेचा दुटप्पीपणा असून एकीकडे प्रकल्पाला आवतण द्यायचे व दुसरीकडे जनतेचा कल विरोधात आहे असे लक्षात आल्यावर आम्ही जनतेबरोबर, अशी भूमिका घ्यायची हे ठीक नव्हे.  सेनेचेही बगलबच्चे जमीन खरेदीत अग्रेसर : बाळ माने ......