Wed, Jan 16, 2019 10:13होमपेज › Konkan › मालवाहतूकदार संपावर

मालवाहतूकदार संपावर

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 9:59PM

बुकमार्क करा
चिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळूण-खेड तालुका मालवाहतूक व्यावसायिक संघाने सोमवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यामुळे या दोन तालुक्यांतील 1,100 ट्रक थांबले आहेत. दरवाढीसाठी हा संप सुरू झाला आहे.

गेले अनेक दिवस भाडेवाढ होत नसल्याने संघटनेने संपाचे हत्यार उगारले आहे. याचा परिणाम लोटे, खेर्डी  औद्योगिक वसाहतींवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.