Wed, Mar 20, 2019 03:12होमपेज › Konkan › निवृत्त शिक्षकाची आत्महत्या

निवृत्त शिक्षकाची आत्महत्या

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 10:27PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शहरालगतच्या मिरजोळी-बौद्धवाडी येथे राहणार्‍या निवृत्त शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सुदाम अण्णा कांबळे (72) असे त्यांचे नाव आहे. सुदाम यांचा मुलगा प्रदीप कांबळे याने शनिवारी सकाळी चिपळूण पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार वडील शुक्रवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास घरातील कुणालाही न सांगता बाहेर गेले. मात्र, सकाळपर्यंत परत आले नाहीत. दरम्यान, सकाळी 8 च्या सुमारास वाडीतील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.