Mon, May 20, 2019 08:54होमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची धमक शिवसेनेत नाही : निलेश राणे 

रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची धमक शिवसेनेत नाही : निलेश राणे 

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:43PM

बुकमार्क करा
चिपळूण : प्रतिनिधी

 शिवसेना जैतापूर प्रकल्प रद्द करू शकली नाही. आता नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेमध्ये धमक नाही. कोकणचे प्रश्न नारायण राणेच सोडवू शकतात.त्यामुळे सर्वांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखाली यावे, असे आवाहन पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.

राणे म्हणाले, याआधी काँग्रेसमध्ये असताना आपल्याला उत्तर रत्नागिरीमध्ये काम करू दिले जात नव्हते. मात्र, आता स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून संघटना वाढीची जबाबदारी आहे. अनेकजण प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आपण या भागात संघटना वाढवू असा त्यांनी विश्‍वास व्यक्‍त केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जाहीर झाले आहेत आता काही दिवसांतच 9 तालुकाध्यक्ष जाहीर होणार आहेत. आपल्याला प्रामाणिक कार्यकर्ते हवे आहेत. नुसती संख्या मोठी नको आहे. यावेळी  त्यांनी शिवसेनेवर टीका केली. आम्ही समाजासाठी उपक्रम राबिविणार आहोत. प्रसंगी रस्त्यावर उतरणार आहोत. 

त्यामुळे आगामी काळात संघटना उभी करून निवडणुका जिंकू, असा विश्‍वास व्यक्‍त केला. सेना जैतापूरला विरोध करीत आहे तर दुसर्‍या बाजूला प्रकल्प उभा राहात आहे. आता नाणारला स्थानिकांचा विरोध असल्याने शिवसेना विरोधी भूमिका घेत आहे. पण लोकांना राजकीय पक्ष नको आहे. लोकांचा विरोध असेल तर आम्ही जनतेसोबतच आहोत.‘एनडीए’त असलो तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे. 

काँग्रेसमध्ये पाडापाडी चालते तेथे कार्डवाले कार्यकर्ते आहेत.असे कार्यकर्ते आम्हाला नको आहेत.असे सांगून भीमा-कोरेगावप्रश्‍नी सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महिला जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, राजन देसाई, मंगेश शिंदे, परिमल भोसले, अजय साळवी, वैभव वीरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.