Wed, Mar 27, 2019 02:00होमपेज › Konkan › रेशन दुकानदार 19 रोजी विधानभवनवर धडकणार

रेशन दुकानदार 19 रोजी विधानभवनवर धडकणार

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 11:21PMचिपळूण : खास प्रतिनिधी

राज्यातील रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 19 मार्च रोजी विधानभवनावर धडकणार आहेत. या मोर्चामध्ये रास्त दर धान्य दुकानदार संघटनाही सहभागी होणार आहे. जिल्हाभरातून साडेपाचशे दुकानदार या मोर्चात सहभागी होतील, असे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले. दुकानदारांना पॉस मशिनचे वाटप करण्यात आले असले तरी काही तालुक्यांमध्ये हे मशिन अजूनही पोहोचलेले नाही. त्यांना हे मशिन तत्काळ मिळावे. अनेक ठिकाणी मशिनवर कमिशन वाढवून दिसते. तूरडाळ वितरणामध्ये तूट येते. याचा विपरित परिणाम दुकानदारांवर होत असून त्यामुळे थेट चलन भरून तूरडाळ मिळावी. यावेळी ‘एनएफटी’द्वारे तुरडाळ खरेदी न करण्याचा निर्णय रेशन दुकानदारांनी घेतला आहे.

नुकतीच जिल्हा रास्त दर धान्य दुकानदारांची बैठक चिपळुणात झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, सहसचिव प्रकाश आग्रे, शशिकांत दळवी, विजय राऊत, अनंत केंद्रे, चंद्रकांत दळवी, संतोष देसाई व जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 19 रोजीच्या मोर्चाचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातून 60 दुकानदार मोर्चात सहभागी होणार असून मागण्या मांडण्यात येणार आहेत.