Sat, Jul 20, 2019 23:42होमपेज › Konkan › राष्ट्रीय महामार्गावर अपघातात कापसाळ येथे वृद्ध ठार 

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात कापसाळ येथे वृद्ध ठार 

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 9:30PMचिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळ दुकानखोरी येथे महिंद्रा बोलेरो पिकअप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. दिलीपकुमार विठ्ठलभाई पटेल (वय 65, रा. कांदिवली, मुंबई) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या अपघाताची खबर चालक संतोष बबन जावळे (36, रा. कामथे जावळेवाडी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. ते महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (एमएच08 डब्ल्यू 4403) घेऊन खेर्डीकडे, तर छोटा हत्ती ही गाडी (एमएच02 सीई 5481) ही मुंबईहून गोव्याकडे जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ दुकानखोरी येथे या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दिलीपकुमार विठ्ठलभाई पटेल हे ठार झाले.