Wed, Apr 24, 2019 00:01होमपेज › Konkan › मिरजच्या विद्यार्थ्याची पालवण येथे आत्महत्या

मिरजच्या विद्यार्थ्याची पालवण येथे आत्महत्या

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 10:28PMचिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील मांडकी -पालवण येथील डॉ. तानाजीराव चोरगे कृषी महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्याने डाव्या हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे. सुमित प्रकाश पाटील (22, मूळ रा. बिसूर, ता. मिरज, जि. सांगली, सध्या रा. पालवण) असे त्याचे नाव आहे.

सुमित आपला मित्र सौरभ चंद्रशेखर लिंगायत याच्याबरोबर पालवण येथील किशोर लाड यांच्या चाळीमध्ये राहत होता. सौरभ हा रविवारी (दि. 8) दुपारी 1.30 वा.च्या सुमारास चाळीत आला व त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, सुमितने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याला संशय आल्याने सौरभने ही माहिती परिसरातील लोकांना सांगितली व रूम नं. 2 चा दरवाजा उघडण्यात आला. यावेळी सुमित पाटील रक्‍ताच्या थारोळ्यात खाली पडलेला आढळला. ही घटना सावर्डे पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यामध्ये ही घटना सकाळी 9 ते दुपारी 1.30च्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज  पोलिसांनी व्यक्‍त केला. मृत सुमितने आपल्या डाव्या हाताच्या नसा कापून घेतल्या होत्या व त्यानंतर त्याने ब्लँकेटने गळफास लावून घेतला. नसा कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला व त्यामुळे तो रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता.