Mon, Nov 19, 2018 04:46होमपेज › Konkan › मुलीचे अपहरण; दोघांना अटक

मुलीचे अपहरण; दोघांना अटक

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 9:15PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शहरातील अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे सांगून पळवून नेल्याप्रकरणी आणि संबंधितांना राजीवडा (रत्नागिरी) येथे लपविल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एकजण रत्नागिरीतील राजीवडा भागातील असून त्याचे नाव साजिद अकबर खान पावसकर असे आहे तर दुसरा पिंपळी येथील रिहान मुक्तार बकारी हा आहे. पोलिसांनी शनिवारी (दि. 3) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत पांडुरंग भिकू पाष्टे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात 23 जानेवारी रोजी फिर्याद दिली होती. त्यांची अल्पवयीन मुलगी 23 जानेवारीपासून बेपत्ता होती. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस तपासात या मुलीचे अपहरण झाल्याचे पुढे आले आहे. 

तालुक्यातील पिंपळी येथील रिहान मुक्तार बकारी याने लग्नाचे आमिष दाखवून या मुलीला पळविले. या नंतर हे दोघेही रत्नागिरी येथे गेले. रत्नागिरी राजीवडा मोहल्ला येथील साजिद अकबरखान पावसकर (34) याने या दोघांना आपल्या घरी लपवून ठेवले. त्यामुळे या दोघांवरही अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून रविवारी सकाळी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास हे. कॉ. दाभोळकर करीत आहेत.