Tue, Mar 19, 2019 12:04होमपेज › Konkan › बोगस डॉक्टरला अटक

बोगस डॉक्टरला अटक

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:23PMचिपळूण : खास प्रतिनिधी

खेड तालुक्यातील धामणंद येथे बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या कावीळतळी येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून साडेचार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिस नाईक उदय वाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार कावीळतळी येथील शंकर बापू सातपुते (वय 53) हे धामणंद येथे अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र वावे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धामणंद येथे तपासणी केली असता शंकर सातपुते हे बोगस वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले.

त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी हे रुग्णालय आपल्या मुलीचे असल्याचे सांगितले. मुलीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता ती पुण्यात असल्याचे सातपुते यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक फडणीस आणि सहकार्‍यानी रुग्णालयाची झडती घेतली असता तेथे 4 हजार 500 रुपयांचे वैद्यकीय साहित्य मिळाले.यावेळी रामचंद्र गंगाराम उतेकर यांना बेकायदेशीररीत्या सलाईन लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर सोमवारी रात्री गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.