Mon, Jan 21, 2019 05:11होमपेज › Konkan › अटलबिहारी वाजपेयी यांना अभिमानमूर्ती पुरस्कार जाहीर

अटलबिहारी वाजपेयी यांना अभिमानमूर्ती पुरस्कार जाहीर

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:39PMचिपळूण : खास प्रतिनिधी

येथील चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील अभिमानमूर्ती पुरस्कार ‘भारतरत्न’ माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झाला आहे. पुणे येथे ऑक्टोबरमध्ये मान्यवरांच्या हस्ते मरणोत्तर पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. येथील चतुरंगच्या कार्यालयात सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत 
विद्याधर निमकर यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, देशासाठी निरपेक्ष वृत्तीने उतुंग व सर्वोत्तम  काम करणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीला दरवर्षी 
‘अभिमानमूर्ती’  पुरस्काराने गौरविण्यात येते. 

या वर्षी प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे मानवतावादी, लोकशाही मानणारे आणि देशहित जपणारे राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या निधनानंतर आलेल्या प्रतिक्रियातून त्यांचे जीवन अधिक उलगडले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘चतुरंग’चा हा सर्वोच्च पुरस्कार प्रथमच मरणोत्तर दिला जाणार आहे. मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या आधी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. के. कस्तुरीरंगन, टी. एन. शेषन, ई. श्रीधरन, नारायण मूर्ती, रघुनाथ माशेलकर तसेच कमांडर दिलीप दोंदे यांना देण्यात आला आहे. प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असून वाजपेयी यांच्या दुसर्‍या मासिक श्राद्धाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.