Fri, Jul 19, 2019 05:05होमपेज › Konkan › रंगात रंगली अवघी कणकवली...

रंगात रंगली अवघी कणकवली...

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 10:16PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गात इतरत्र होळीच्या पहिल्या पाच किंवा सात दिवसांमध्ये रंगपंचमी साजरी होते. मात्र, कणकवलीत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार शनिवारी कणकवली शहरामध्ये दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत बालगोपाळांसह तरुणाईने विविधांगी रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. या रंगोत्सवामुळे अवघी कणकवली रंगात रंगून गेली होती. 

रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच तरुणाई आणि लहान मुलांची तयारी सुरू होती. दुपारी 1 वा.पासून नाक्या-नाक्यावर या मंडळींनी रंगोत्सवास प्रारंभ केला. मात्र, दुपारी 2 नंतर खर्‍या अर्थाने या रंगपंचमीला सुरुवात झाली. एकमेकांवर रंगांची उधळण करत रंगांच्या पिचकार्‍या मारत नाक्या-नाक्यावर आणि प्रमुख रस्त्यांवर रंगपंचमीचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी 5 नंतर गावर्‍हाटीच्या प्रथा-परंपरेनुसार ढोल वाजविल्यानंतर या रंगोत्सवाची सांगता झाली.

URL :