Sun, Jan 20, 2019 06:08होमपेज › Konkan › जातीय प्रश्‍न सोडवण्यासाठी साईबाबांची शिकवण महत्त्वाची : ना. केसरकर

जातीय प्रश्‍न सोडवण्यासाठी साईबाबांची शिकवण महत्त्वाची : ना. केसरकर

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:22PM

बुकमार्क करा
कणकवली :  शहर वार्ताहर  

साईबाबांचे असंख्य भक्त या जगभरात पसरले आहेत. 100 वर्षापूर्वी साईबाबांनी सर्व धर्म समभाव, एकात्मता या भावनेतून संदश दिला होता. मनाची शांती लाभण्यासाठीच असंख्य भक्‍त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जातात.सद्या राज्यात व देशात जातीय तेबाबत सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व धर्म समभाव हा संदेश सर्वात महत्वाचा ठरत आहे.  सबका मालिक एक है या महानाट्यातुन नव्या पिढीसमोर साईबाबांचा जीवनपट उलघटणार आहे. त्यामुळे या महानाट्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य असणार असून महानाट्यासाठी प्रायोजक मिळवून देण्यसाठी आपण प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना  केले.

कणकवली येथील सबका मालिक एक है या महानाट्याच्या  कार्यालयाला ना.केसरकर यांनी शुक्रवारी सदिच्छा  भेट दिली. याप्रसंगी दीपक केसरकर यांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना आ.वैभव नाईक, भाजपा नेते अतुल रावराणे, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,  नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, संयोजक संदेश पारकर, महानाट्याचे दिग्दर्शक सोमेश्वर बालपांडे, निर्माता प्रशांत डांगे, शैलेश भोगले,जि.प.सदस्य नागेंद्र परब, अ‍ॅड.हर्षद गावडे, अमरसेन सावंत, प्रा.दिवाकर मुरकर, प्रा.हरिभाऊ भिसे, नगरसेवक सुशांत नाईक, शेखर राणे, कन्हैया पारकर ,रुपेश नार्वेकर ,प्रसाद अंधारी ,संतोष पुजारे आदी जेष्ठ नागरिक तसेच शहरातील नागरिक  उपस्थित होते.