Sat, Jan 19, 2019 19:52होमपेज › Konkan › रत्नागिरी : इनोव्हा गाडी नदीत कोसळली, ३ जण बेपत्ता 

रत्नागिरी : इनोव्हा गाडी नदीत कोसळली, ३ जण बेपत्ता 

Published On: Jun 27 2018 2:19PM | Last Updated: Jun 27 2018 2:19PMसंगमेश्वर (जि. रत्‍नागिरी): प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील धामणी मुंबई-गोवा महामार्गावर इनोव्हा गाडी टायर फुटून कार नदीत कोसळली. या अपघातात १२ वर्षाच्या मुलासह दोन महिला बेपत्‍ता झाल्‍या आहेत तर गाडी चालकाला वाचविण्यात स्‍थानिकांना यश आले. 

इनोव्हा गाडी राजापुरातून मुंबईला निघाली होती. लांजात खेड्ला जाणारे  चौघे जण या गाडीत बसले हाते. यात दोन लहान मुले आणि एका दाम्पत्याचा समावेश होता. गाडी नदीत कोसळल्‍यानंतर यातील तिघे जण बेपत्‍ता झाले तर स्‍थानिकांनी चालकाला वाचविले. 

दरम्‍यान, बचाव पथक घटनास्‍थळी पोहचले असून, बेपत्‍ता तिघांचा शोध सुरु आहे.