Sun, Nov 18, 2018 00:45होमपेज › Konkan › बसमधून उतरविल्याने वाहकाविरोधात विद्यार्थिनीची तक्रार

बसमधून उतरविल्याने वाहकाविरोधात विद्यार्थिनीची तक्रार

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 9:51PM

बुकमार्क करा
दापोली : प्रतिनिधी

सकाळी 7 वाजता भडवळे येथून सुटणारी दापोली-भडवळे एस.टी बसमध्ये फणसू येथे सुरभी सुर्वे ही विद्यार्थिनी फणसू ते दापोली असा प्रवास करत असताना या बसमधील वाहक सी.एस.तडवी यांनी विद्यार्थिनीने हातातील बॅग गाडीमधील कॅरिअरमध्ये ठेवली नाही, म्हणून वाद घालत या विद्यार्थिनीला गावतळे ते असोंड या मध्यभागामध्ये गाडीतून उतरवले. ही घटना  काही दिवसांपूर्वी घडली असून या विद्यार्थिनीने याची तक्रार दापोली आगार व्यवस्थापकांसह तक्रारवहीमध्ये केली आहे. 

याबाबत असोंड पचायत समिती गण सदस्या वृषाली खडपकर यांनी या घटनेची दखल घेऊन येथील एस.टी. व्यवस्थापक वैभव कांबळे यांना या घटनेची माहिती देऊन या वाहकावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. या विद्यार्थिनीला रस्त्यामध्येच उतरल्याने या विद्यार्थिनीची गैरसोय झाली आणि शाळेचा खाडा झाला. एस.टी वाहक अशाप्रकारे शाळकरी विद्यार्थ्यांशी वादाचे प्रसंग घडवून मध्येच उतरविण्यास भाग पाडत असतील तर ते योग्य नाही. तरी एस्.टी. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असेही खडपकर यांनी सांगितले. याबाबत एस.टी व्यवस्थापक कांबळे यांनीदेखील घडलेला प्रकार योग्य नसून याबाबत एस.टी. वाहकाला जाब विचारला जाईल, असे सांगितले.