Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Konkan › आजगाव येथे एसटी आणि ओमनीची धडक : चार जखमी

आजगाव येथे एसटी आणि ओमनीची धडक : चार जखमी

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:45PM

बुकमार्क करा
मळेवाड : वार्ताहर

आजगाव ताटीची व्हाळी येथे एसटी व मारुती व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात  चार जण जखमी झाले.जखमींना उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.  शिरोड्या हुन मळेवाडच्या दिशेने जाणारी मारुती ओम्नी व्हॅन व मळेवाडहुन शिरोड्या च्या दिशेने जाणारी एस टी बस यांच्यात हा अपघात झाला.या अपघातात व्हॅनच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून चार जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.जखमी मध्ये गौरेश नाईक (आरोस),निकिता घाटकर (मळगाव), तृप्ती धुरी (इन्सुली), मोतीराम साटेलकर (साटेली) यांचा समावेश आहे. एस टी बस ही कलेश्वर विद्यामंदिर, नेरूरच्या मुलाची सहल घेऊन शिरोडा येथे जात होती.