Fri, Jul 19, 2019 22:11होमपेज › Konkan › संगमेश्वर : येडगेवाडी बसला अपघात; बस कलंडल्याने अनर्थ टळला

संगमेश्वर : येडगेवाडी बसला अपघात; बस कलंडल्याने अनर्थ टळला

Published On: Feb 22 2018 1:35PM | Last Updated: Feb 22 2018 1:35PMगिमवी : प्रतिनिधी 

देवरुख - येडगेवाडी बसला बौध्दवाडीजवळ अपघात झाला. अवघड वळणावर बस आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या केडला कोलमडली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. 

देवरुख आगारातून सकाळी ६.३० वा सुटणा-या बस नेहमीप्रमाणे बौध्दवाडीजवळ आली असता चालकाचा ताबा सुटला आणि शेजारीच असणाऱ्या गटारात बसची चाके गेली आणि बस कोलमडली. या अपघातात जिवीतहानी झालेली नाही. देवरुख - येडगेवाडी ही शाळेसाठी सुरु केलेली विशेष बस असून या अपघातादरम्यान सुदैवाने शाळेतील विद्यार्थी बसमध्ये नव्हते. यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.