Fri, Dec 13, 2019 18:45होमपेज › Konkan › दोन एसटी गाड्यांची धडक; 20 प्रवासी जखमी

दोन एसटी गाड्यांची धडक; 20 प्रवासी जखमी

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:07PM

बुकमार्क करा

संगमेश्‍वर  : वार्ताहर

संगमेश्‍वर - देवरूख मार्गावर दोन एस.टी. गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 1 महिला प्रवासी गंभीर  तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी 12 वा. सुमारास  लोवलेनजीक घडला.  या अपघातामुळे एस.टी.चा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.

चालक हिंदुराव सुतार, वाहक एम. एल. नलावडे बस (एम.एच.14 - बीटी - 2452) घेऊन 11.45 वा. संगमेश्‍वर - देवरूख या मार्गाने निघाले होते.  बस  सुटली त्याचवेळी पाऊस कोसळत होता. या गाडीचे पुढचे दोन्ही टायर गुळगुळीत होते. ही गाडी देवरूख मार्गावर लोवले येथे आली असता समोरून देवरूख आगारातून 11.15 वा. सुटलेली देवरूख - संगमेश्‍वर - रेल्वेस्टेशन बस (एम.एच. 20 - बीएल - 1962) ही घेऊन चालक एम. डी. मोहिते व वाहक आर. ए. तावडे येत होते. तेथील वळणावर आलेल्या गाडीला बाजू देण्याच्या प्रयत्नात देवरूख गाडी विरूद्ध बाजूला ओढली गेली आणि दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली.

अपघातात नसीमा युसुफ शिरगावकर (35, आंबवली) या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात दोन्ही बसमधील सुधाकर हरी नेवरेकर, द्रौपदी तुकाराम कांबळे, दक्षता लिंगायत, प्रसाद कनावजे, प्रतीक्षा सावंत, रूपेश कोवळे, कनिष्का गुरव, शैलेश गुरव, राजाराम गुरव, सविता पवार, जयवंती कोरेकर, गंगाराम कोरेकर, राजाराम कदम, अनेय पवार, सरस्वती जाधव, आशिष गुरव, हिंदुराव सुतार, नीलम लाड, संजय गेल्ये आदी जखमी झाले.

जखमींना तत्काळ संगमेश्‍वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी महिलेला तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.