Sun, Sep 23, 2018 12:34होमपेज › Konkan › पेटता वटवृक्ष घरावर कोसळला

पेटता वटवृक्ष घरावर कोसळला

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 10:58PMबांदा : प्रतिनिधी

बांदा - देऊळवाडी येथील रस्त्यानजीक असलेला जुनाट वटवृक्ष आगीने जळाल्याने नजीकच्या मयेकर यांच्या घरावर कोसळला. सुदैवाने या घराच्या पडवीनजीक बसलेल्या श्रीमती मयेकर ही वृद्ध महिला बालंबाल बचावली. ही आग आज दुपारी 1 वा. च्या सुमारास वटवृक्षाच्या बुंध्याशी श्रीमती कामत यांच्या कामगारांनी घातली होती. हा वटवृक्ष सुकलेला असल्याने त्याने लगेच पेट घेतला व घरावर कोसळला. त्यामुळे येथील वीज वाहिन्याही तुटून पडल्या. हा वटवृक्ष सपशेल रस्त्यावरच पडल्याने देऊळवाडीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला होता. ही आग आणखी भडकल्याने सावंतवाडी येथून अग्‍निशमनदलाच्या बंबाला बोलविण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात यश आले. मात्र, येथील ग्रामपंचायत सदस्य हर्षद कामत आणि  इतरांनी झाडाखाली आग घालणार्‍या श्रीमती कामत यांना धारेवर धरत जाब विचारला. तसेच हे झाड बाजूला करण्यासाठी येणारा जेसीबीचा खर्च देण्याची मागणी केली. यावेळी श्रीमती कामत यांनी जेसीबीचा खर्च देण्याचे मान्य केले.

ही आग विझविण्यासाठी स्वप्नील सावंत, साईनाथ धारगळकर, आबा धारगळकर, घनश्याम सावंत, हर्षद कामत, सरपंच मंदार कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.