Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › जानवलीत घरफोडी

जानवलीत घरफोडी

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:15PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

कणकवली शहरानजीक जानवली- रामेश्‍वरनगर येथील सौ. सुजाता गणपत सावंत यांच्या बंद घराच्या मागील बाजूच्या किचन दरवाजाचा आतील कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने कपाटातील 19 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि  2 हजार रु. रोख रक्‍कम चोरून नेली. या दागिन्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे सुमारे 5 लाख आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 10.30 ते 1.30 च्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीने पुन्हा एकदा जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कणकवली शहरापासून सुमारे 2 किमी. अंतरावर सौ. सुजाता सावंत यांचा जानवली-रामेश्‍वरनगर येथे बंगला आहे. त्यांचे पती कणकवलीतील एलआयसी कार्यालयात कामाला आहेत. शुक्रवारी सुट्टी असल्याने सौ. सावंत कुटुंबीय   शुक्रवारी भिरवंडे येथे मूळ गावी गेले होते. दुपारी 1.30 च्या सुमारास पती, पत्नी पुन्हा जानवली येथे घरी आले. तर मुले गावीच होती. दुपारी सौ. सुजाता सावंत यांनी घराचे कुलूप उघडले असता दरवाजा आतून ऑटोलॉक असल्याचे लक्षात आले.  

सौ. सावंत यांनी आपल्याकडील चावीने  कुलूप उघडले असता घरातील लाईट चालू होत्या. किचनचा मागील दरवाजा अर्धवट उघड्या स्थितीत होता. त्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटलेला होता. त्यांना संशय आल्याने त्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली असता आतील बेडवर कपाटातील सर्व साहित्य आणि दागिन्यांचे डबे अस्ताव्यस्त टाकल्याचे दिसले.