Thu, Jun 27, 2019 09:56होमपेज › Konkan › गोठणेत बोट उलटून बहीण-भावाचा मृत्यू 

गोठणेत बोट उलटून बहीण-भावाचा मृत्यू 

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:25PMविरण/श्रावण : वार्ताहर

मालवण तालुक्यातील गोठणे येथील आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे गडनदीच्या डोहात बोटिंग करत असताना फायबर बोट उलटल्याने त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. पोहता येत असल्याने एक बहीण सुदैवाने बचावली. ही दुर्घटना रविवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास गडनदीवरील गोठण्याची कोंड येथे घडली. त्यात सुवर्णा दशरथ आचरेकर (वय 25) व तिचा भाऊ आकाश (20) यांंचा बुडून मृत्यू  झाला. तर बहीण दीपाली बचावली. स्थानिक ग्रामस्थांनी शोध मोहीम राबविल्यानंतर काही तासांनी दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे गोठणे गावात शोककळा पसरली होती. 

कणकवली-आचरा मार्गावर गोठणे येथील आचरेकर थांब्यानजीक आचरेकर कुटुंबीयांचे घर आहे. या कुटुंबातील मोठी मुलगी सुवर्णा ही शनिवारी  मुंबईवरून गावी आली होती. रविवारी सुट्टी असल्याने सुवर्णा बहीण दीपाली, भाऊ आकाश  व चुलत बहीण अश्‍विनी असे चौघे जण  कपडे धुण्यासाठी घरासमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या गडनदीपात्रात सकाळी 10.30 वा.च्या सुमारास गेले होते. कपडे धुवून वाळत घातल्यानंतर आकाशला नदीजवळ असलेली फायबरची बोट दिसली. बोट पाहिल्यानंतर या भावंडांना नदीपात्रात बोटिंग करण्याचा मोह झाला. त्यानंतर आकाश, सुवर्णा आणि दीपाली ही तिन्ही भावंडे बोटिंगसाठी गेली. तर चुतल बहीण अश्‍विनी ही नदीपात्रालगत थांबून मोबाईलमध्ये त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करत होती. बोटिंग सुरू असताना काही वेळाने फायबर बोट वार्‍यामुळे हळूहळू डोहाकडे सरकू लागली. डोहातील खोल पाण्यात बोट पुढे जाऊ लागल्याने आकाशने वल्ह्याने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात बोट पलटी होऊन तिन्ही भावंडे डोहात बुडाली.

 बहीण व भाऊ बुडाल्याचे दीपाली व व्हिडीओ घेत असलेल्या अश्‍विनी यांच्या लक्षात आले.  त्यांनी आरडाओरड केल्याने जवळच शेळी राखत असलेल्या दीपक तांबे यांनी नदीपात्रात धाव घेतली. तर अश्‍विनी हिने घरी जात याची माहिती कुटुंबीयांना दिली. ग्रामस्थ नीलेश हाटले, तुषार आठले, शैलेश चव्हाण, बंटी आठले, उपसरपंच घनश्याम  चव्हाण, बाळू कोळंबकर, महेश पारकर आदींनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. एक तासाने सुवर्णाचा मृतदेह डोहाबाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यानंतर फायबर बोटीने आकाशचा शोध सुरू करण्यात आला.
 आपत्ती व्यवस्थापनाविरोधात संताप/2