Mon, Nov 19, 2018 09:13होमपेज › Konkan › लाचखोर दुय्यम निबंधकाच्या पुणे येथील घरावरही छापे

लाचखोर दुय्यम निबंधकाच्या पुणे येथील घरावरही छापे

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:58PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

 देवगड येथील लाचखोर दुय्यक निबंधक श्रीनाथ गोविंद हुल्याळकर  याला जिल्हा विशेष न्यायाधीश एम. बी.  तिडके यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.लाचलुचपत विभागाने त्याच्या पुणे येथील घरावर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

बुधवारी दुय्यम निबंधक हुल्याळकर याला हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर हुल्याळकर यांना गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.