Sat, May 30, 2020 12:01होमपेज › Konkan › व्यावसायिकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला

व्यावसायिकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला

Published On: Jun 25 2019 12:35PM | Last Updated: Jun 25 2019 12:35PM
गुहागर (गिमवी ) : प्रतिनिधी

शृंगारतळी येथे केरळच्या वृद्ध  व्यावसायिकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. रामकृष्णन नायर (वय, ५५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जळालेल्या अवस्थेमध्येही रामकृष्णन यांच्या अंगावरील कपडे तसेच दिसत असल्यामुळे हा घातपात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

रामकृष्णन हे शृंगारतळी येथे गेली अनेक वर्षे वाहनांच्या टायरचे पंक्चर काढायचा व्यवसाय करत होते. हा घातपात असेल तर तो कोणी व का केला? हे चौकशीनंतरच समजेल असे पोलिसांनी सांगितले.