Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Konkan › दारूमुक्ती आंदोलन करणार : तृप्ती देसाई  

दारूमुक्ती आंदोलन करणार : तृप्ती देसाई  

Published On: Jan 10 2018 2:52PM | Last Updated: Jan 10 2018 4:17PM

बुकमार्क करा
महाड : दिपक साळुंखे  

दारूमुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले आहे. महाड तालुक्यातील कोकण विकास प्रबोधनी संचालित मॉडर्न इंग्लिश स्कूल चोचींदेच्या वार्षिक स्नेह संमेलन आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन तृप्ती देसाईंच्या हस्ते झाले. 

या कार्यक्रमात बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘महिलांचा मंदिर प्रवेश ते दर्गा प्रवेशासाठी लढा देताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त झाले. या यशस्वी आंदोलनानंतर दारूमुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यासाठी पदयात्रा सुरू करणार असून, याकरिता  महाडमधील सर्वपक्षीयांनी सहकार्य  करावे.’ 

याचबरोबर तृप्ती देसाईंनी महिलांनी सक्षम होणे ही काळाची गरज असून, भाईगिरी दादागिरीला चोख उत्तर देण्याकरता भूमाता ब्रिगेडने ताईगिरी पथक स्थापन केले आहे. समानता कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी. याचबरोबर स्त्रीभूण हत्या रोखली पाहिजे याकरिता सर्वांनीच प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले . 

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुमोदिनी चव्हाण, यांनी केले तर सूत्रसंचालन अॅड संदीप सर्कले, यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते   विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पालकांचा सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी व्यासपीठावर  कोकण विकास प्रबोधनीच्या अध्यक्षा सौ. कुमोदिनी रविंद्र चव्हाण, बीएमसीसी महाविद्यालय पुणेचे प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, प्राध्यापक डॉ. राजेश कुचेकर, भाजप तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, शिरगावचे सरपंच सचिनभाऊ ओझर्डे, श्री रवींद्र चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .