Thu, Feb 21, 2019 15:44होमपेज › Konkan › खेडमध्ये आज भीमसैनिकांचा मोर्चा

खेडमध्ये आज भीमसैनिकांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी

महामानवाचा अपमान करणार्‍यांचा छडा लावणारच, असा विश्‍वास खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजरत्न तांबे यांनी व्यक्‍त केला. शनिवारी (दि. 31) खेड शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे गुरुवारी (दि. 29) दुपारी 12 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष राजरत्न तांबे बोलत होते. तांबे म्हणाले, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे दि. 31 रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला दि. 31 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील खांबतळ्या शेजारी जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात होईल. 

Tags : Konkan, Konkan Newws, bhim sainik, rally,  khed


  •