Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Konkan › रोहिंग्याच्या रूपाने देशात आक्रमण : भिडे गुरुजी 

रोहिंग्याच्या रूपाने देशात आक्रमण : भिडे गुरुजी 

Published On: Dec 23 2017 8:39PM | Last Updated: Dec 23 2017 8:39PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

प्राचीन काळापासून आपल्या देशावर आक्रमण होत आली .आताही ती बांगलादेशी तसेच रोहिंग्याच्या रूपाने सुरूच आहेत, मात्र, या आक्रमणांना मानवतावादाच्या आडून देशात पायघड्या पसरवल्या जात आहेत. अशी टीका संभाजी भिडे गुरुजी यांनी शनिवारी येथे केली.

रायगड किल्ल्यावरील 32 मण सुवर्ण सिंहासन संकल्प पुर्तीसाठी संभाजी भिडे गुरुजी यांचे व्याख्यान येथील गांधी चौकात स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात शिवरायांचे कार्यक्रम साजरी करणारी मंडळी शिवरायांचे मनापासून कितपत चिंतन करतात हा संशोधनाचा विषय आहे. जसा अमवासेला चन्द्र नाही, तसा तशीच अवस्था या मंडळींची आहे. आपण फार काही शिकू एव्हडा आपल्या देशाचा इतिहास आहे, मात्र, तो वाचायला आपल्याकडे वेळ नाही. मुसलमान, ख्रिश्चन समाज आपल्याच देशात राहून हिंदूंच्या अस्तित्वाला आव्हान देत आहेत. मात्र, मानवतावाद, सर्वधर्मभावाच्या नावाखाली त्यांच्या कारवायांना मोकळे रान करुन दिले जात आहे.’’