Wed, May 22, 2019 22:43होमपेज › Konkan › भरणेनजीक आरामबसला अपघात

भरणेनजीक आरामबसला अपघात

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:12PMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार दि.31 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी अहमदाबाद येथील ‘नीशा ट्रॅव्हल्स’ची आरामबस चालकाचे नियंत्रण सुटून भरणे शिंदेवाडीनजीक रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात 36 जण जखमी झाले. जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालय व  अन्य एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून, पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खेड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून दि.31 रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी आरामबस चालकाचे नियंत्रण सुटून भरणे शिंदेवाडीनजीक रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघाताची माहिती बसमधून प्रवास करणार्‍या सरोज महेशभाई राठोड (53,रा.अहमदाबाद, गुजरात) यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नीशा ट्रॅव्हल्स’ची आरामबस चालक मोहन दि.31 रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणेनाक्यानजीक काशीमठ या ठिकाणापासून पुढे त्याने बसचा वेग वाढवला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुढे भरणे शिंदेवाडीनजीक बस रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली. 

या अपघातात अहमदाबाद गुजरात येथील रहिवासी असलेले 36 जण जखमी झाले. त्यांपैकी कन्हैयालाल एम.परमार (5), विपुल मेहता (24), जगदीश पांड्या (50), महेशकुमार राठोड (56), मधुबेन जगदीश पांड्या(50), प्रतीक मेहता (27), जयश्री परमार(32), दिनेश परमार (51), दशरथभाई राऊल (38), रेबाबेन नितीनभाई कठेडिया(52), स्वप्ना बेघडा (24), अंकिता पांडे(26), संजीत परमार (47), जेमेनी श्रीमाली (27), विधी मेहता(22), आस्था श्रीमाली(15), लक्षांत श्रीमाली(22), स्मिताबेन राणा(40), हंसाबेन अमिन(50), शकुंतला परमार(61), कैलास बेन(50), बिपीन श्रीमाली(53), क्रिश बैकर(8), उन्नती परमार (24), प्रकृती परमार(21) यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच अंकिता पंड्या (26), जयश्री परमार(32), रेवाबेन पोठडिया (52), विधी मेहता(22), दशरथभाई रावल(35), स्मिताबेन राणा (42), धवल बेगडा(32), रचना बेगडा(28), जगदीश पंड्या, बिपीन श्रीमाली(53) व नैनाबेन परमार(35) यांना खेड शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

आरामबसमध्ये एकूण 41 प्रवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अपघातानंतर चालक मोहन याने घटनास्थळावरून पलायन केल्याचे जखमी प्रवाशांनी पोलिसांना सांगितले.