Fri, Nov 16, 2018 15:47होमपेज › Konkan › भैरी बुवाला पोलिसांची शस्त्रसलामी!

भैरी बुवाला पोलिसांची शस्त्रसलामी!

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:14PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीतील बारा वाड्यांचे दैवत श्री देव भैरी बुवाचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भैरीच्या पालखीला मंगळवारी दुपारी 1 वाजता पोलिस कर्मचार्‍यांनी शस्त्रसलामी दिली. यानंतर रंगमपंचमीचा रंग खेळण्यासाठी पालखी शहरात रवाना झाली. रात्री उशिरा शिमगोत्सवाची सांगता झाली.

श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी 1 वाजता सहाणेवरून उठली व पोलिस कर्मचार्‍यांची शस्त्र सलामी घेऊन झाडगाव श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरातून झाडगाव नाक्यावरून गाडीतळ येथे 3.30 वाजता आली. पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सायंकाळी 4.30 वाजता पोहोचून शहर पोलिस ठाण्याला पोहोचली. 

शहर पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पालखीची पूजा केली. पोलिस कर्मचार्‍यांनी भैरीचे दर्शन घेतले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.