Mon, Feb 18, 2019 18:22होमपेज › Konkan › कोंडगाव बाजारपेठेतील दुकान आगीत भस्मसात

कोंडगाव बाजारपेठेतील दुकान आगीत भस्मसात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भडकंबा : वार्ताहर

कोंडगाव बाजारपेठेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत मुरलीधर खेडेकर यांचे दुकान भस्मसात झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. कोंडगाव येथील ग्रामपंचायत इमारतीच्या तळमजल्यावर सुरेश खेडेकर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानातून सकाळी 6:30 वाजता धूर येत असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामस्थांनी ही बाब दुकान मालक खेडेकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

दुकानातील फर्निचर, मालाची पोती, प्‍लास्टिकचे  सामान, पिशव्या यांनी पेट घेतला. दुकानात असलेले दोन फ्रीज जळून खाक झाले. आगीचे वृत्त समजताच कोंडगावचे पोलिस पाटील मारुती शिंदे, पंचायत समिती सदस्य जयसिंग माने, माजी उपसरपंच अजय सावंत, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कोंडगावचे तलाठी मुरकुडे आणि पोलिस पाटील मारुती शिंदे यांनी पंचनामा केला.
 

 

tags ; bhadakamba,news,fire at Kondagaon Market


  •