Sat, Dec 14, 2019 03:33होमपेज › Konkan › अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करणार्‍या आरोपीला शिक्षा

अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करणार्‍या आरोपीला शिक्षा

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 12 2019 9:49PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने 3 वर्षे साधी कैद आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. ही घटना 15 नोव्हेंबर 2017 रोजी साखरतर येथे घडली होती.

सलमान सादिक मुजावर (24, रा.रेहना मोहल्‍ला साखरतर,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेच्या नातेवाईकांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, 15 नोव्हेंबर 2017 रोजी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. ही संधी साधत सलमानने तिच्या घरात घुसून तिच्याशी अश्‍लिल चाळे करुन तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न्ा केला होता. तसेच ही बाब कोणास सांगितल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली होती. तसेच त्यानंतर सलमान याने पीडितेच्या आईच्या मोबाईलवर फोन करुन झाला प्रकार कोणास सांगितल्यास तुला व तुझ्या मुलीला ठार मारीन अशी धमकी दिली होती. याप्रकरणी शहर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सलमानविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होतेे. हा खटला सुमारे दीड वर्ष न्यायालयात सुरु होता.  याबाबत निकाल देताना सरकारी पक्षातर्फे  10 साक्षिदार तपासण्यात आले.  सरकारी वकीलांनी केलेला युक्‍तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सलमान मुजावरला 3 वर्षे साधी कैद आणि 30 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.तसेच दंडाच्या रकमेतील 25 हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले.