Fri, Jan 18, 2019 08:54होमपेज › Konkan › बांद्यातील प्रेक्षणीय स्थळांचे सचित्र भित्तीपत्रक

बांद्यातील प्रेक्षणीय स्थळांचे सचित्र भित्तीपत्रक

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 9:27PMबांदा : वार्ताहर

नट वाचनालयाचे माजी सेक्रेटरी तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निवृत्त विज्ञान शिक्षक शंकर नार्वेकर यांनी बांद्यातील प्रेक्षणीय स्थळे यांचे सचित्र भित्तीपत्रक तयार केले आहे. हे भित्तीपत्रक येथील नट वाचनालयाच्या सभागृहात लावण्यात आले आहे. यात श्री बांदेश्‍वर भूमिका मंदिर, सोहिरोबा मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, रेडे घुमट, हुतात्मा स्मारक यांसह  प्रेक्षणीय स्थळांच्या रंगीत फोटोसह माहिती देण्यात आली आहे.

या भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ.मीना जोशी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीमती विमल तारी, अ‍ॅड. शीतल पावसकर, उज्वला महाजन, सुनीता नाईक, रुपाली शिरसाट, उमांगी मयेकर, मीनाक्षी तेंडोलकर, मंजुश्री मालवणकर, सुस्मिता नाईक, सुनील नातू, अमिता परब यासह अनेक महिला व वाचक उपस्थित होते.